सत्तेवर राहण्याचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडू – राष्ट्रसेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष ग्यानबा म्हस्के

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । देशामध्ये विध्वंसकारी कार्य करणारे आरएसएस आहे. आरएसएस या संघटनेचे हिंदूत्व, हिंदूत्व म्हणून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आरएसएसकडून चुकीचा संदेश दिला जात आहे. केंद्रातील शासन हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. या संघटनेचा जेथे उगम झाला आहे, तेथेच मी जन्मलो आहे. सध्याचे राज्य आणि केंद्र सरकार फक्त हिंदूत्व-हिंदूत्व करते आहे. तोच त्यांचा अजेंडा आहे. सत्तेवर येणे हाच त्यांचा धूर्त डाव आहे, तो आम्ही हाणून पाडू, असे मत राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ग्यानबा म्हसके यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. ग्याबना म्हसके म्हणाले, राष्ट्रवादी सेवा दलाच्यावतीने महाराष्ट्राचा दौरा दि.२३ पासून सुरु आहे. साताऱ्याच्या दौऱ्यावर आलो आहे. सेवा दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सिमा जाधव, येवले, गोरखनाथ आदी उपस्थित होते. तीन चार महिन्यात सेवा दलाचे काम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे.

महाराष्ट्रातील शासन हे घटनाबाह्य शासन असून सुद्धा चुकीचे निर्णय घेत आहे. त्यांच्याकडून जनतेला कोणताही दिलासा देत नाही. महाराष्ट्रातून चांगले प्रोजेक्ट हे गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत. यावर पवारसाहेबांनी भाष्य केले होते की, कुठे तरी चॉकलेट देण्याचे काम आहे. सध्या मला असे वाटते की, शिंदे फडणवीस सरकारने शेतकरी, शेतमजूर, तरुणांची माफी मागितली पाहिजे. बेरोजगार तरुणांची फरफट सुरु आहे. या गव्हमेंटचा मात्र एकच अजेंडा हिंदू आहे. जातीजातीत भांडणे लावायचे काम करत आहे.

आरएसएसला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी सेवा दल काम करत आहे. एक महिन्यात कार्यकारणी उभी करण्यात येणार आहे. प्रत्येक जिह्याचा जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष एक दिवसाचे प्रशिक्षण होईल, विभागीय शिबिर होईल, सर्व या मागे आमचे कल्पना सेवा दलाचा कार्यकर्ता हा कर्मट असतो. आयाराम गयाराम नसतो. याच लोकसभेच्या वेळेला पवारसाहेबांनी भर पावसात भाषण दिले. त्याचे काय परिणाम झाले हे सर्वांनी पाहिले. सेवा दल हा सगळया जाती धर्माच्या लोकांना घेवून जाणारे संघटन आहे. भविष्यात आंदोलन करणार आहोत, असे सांगत त्यांनी रामदेवबाबा आणि राज्यपाल कोषारी यांच्यावरही टिप्पणी केली.


Back to top button
Don`t copy text!