वर्षभरात आयटीआयला ऊर्जितावस्था आणू – मंगलप्रभात लोढा


दैनिक स्थैर्य । 25 जुलै 2025 । सातारा । गेल्याकाही वर्षांत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अवस्था बिकट झाली आहे. या व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी विविध शैक्षणिक कोर्स सुरू करून दर्जेदार पद्धतीचे तांत्रिक शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी निधीची तरतूद करून वर्षभरात आयटीआयला ऊर्जितावस्था आणणार असल्याचे कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. एमआयडीसीत मास भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार मनोज घोरपडे, मासचे अध्यक्ष संजय मोहिते व इतर उपस्थित होते.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, मागील काही वर्षांत आयटीआय शिक्षणाची प्रगती थांबली आहे. या व्यावसायिक शिक्षणकडे विद्यार्थ्यांची घटलेले संख्या कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल केला जाणार आहे. त्यासाठी आयटीआयमध्ये कमी कालावधीचे नवीन कोर्सेस सुरू करून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यांना देखील वेळच्या वेळी प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जाणार आहे, तसेच आयटीआयमध्ये अद्ययावत मशिनरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरात एकही विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहे. राज्यात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, आयटीआयमधून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. दरम्यान, आयटीआयमध्ये कंत्राटी म्हणून काम करणार्‍या शिक्षक व इतर कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी करण्याबाबत लवकरच धोरण आखणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

राज्यातील काही जिल्ह्यांत महिलांसाठी आयटीआय कॉलेज आहे. सातारा देखील विस्ताराने वाढत असून, या ठिकाणी केवळ महिलांसाठी आयटीआयचा प्रस्ताव आल्यास चर्चा करू, असे आश्वासन मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!