दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण | ‘‘‘अविरत रुग्णसेवेसाठी समर्पित’ या उद्देशाने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना गुणवत्तापूर्ण आधुनिक उपचार देण्यासाठी फलटण शहरात ‘डॉ. देशपांडे हॉस्पिटल’ हे महिला रुग्णालय आम्ही सुरु केले आहे. गरिबांचे हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत’’, असे येथील ‘डॉ.देशपांडे हॉस्पिटल’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रियांका देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘डॉ.देशपांडे हॉस्पिटल’ या महिला रुग्णालयाविषयी माहिती देताना देशपांडे बोलत होते.
डॉ. प्रियांका देशपांडे पुढे म्हणाल्या कि, ‘‘गर्भवती महिलांची प्रसुती उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधांसह कमी खर्चात होण्याची सुविधा डॉ.देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षीत कर्मचारी रुग्णालयात कार्यरत असून, प्रसुतिपुर्व तपासणी, स्त्रीरोग निदान व उपचार, बीना टाक्याचे पिशवीचे ऑपरेशन, कॅन्सर चिकित्सा व शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण, लॅबोरेटरी, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, वेदनारहित प्रसूती, अपेंडीक्स, हर्निया यावरील उपचार येथे उपलब्ध आहेत. बारामती येथील शासकीय महिला रुग्णालयाच्या धर्तीवर महिलांसाठी सर्व सुविधा अत्यंत अल्पदरात आम्ही देत असून कमी कालावधीत रुग्णालयाला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे’’, असेही सौ. देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘गरिबांसाठी रुग्णालय सुरु करण्याचे स्वप्न आपले वडील दिवंगत डॉ.दिलीप देशपांडे यांनी पाहिले होते.हे रुग्णालय सुरु झाल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान असून गरीब कुटुंबातील व विशेषत: ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी या रुग्णालयाचा लाभ घ्यावा’’, असेही आवाहन डॉ. प्रियांका देशपांडे यांनी यावेळी केले.