स्थैर्य, इंदापूर, दि. १२ : बोरी ता.इंदापूर येथील शेतकरी कुटुंबातील श्री व सौ सुरेखा राजेंद्र हरिदास शिंदे यांची कन्या त्रृतुजा व अहिल्यानगर ता.बारामती येथील श्री व सौ.मीना नंदकुमार परशुराम जाधव यांचे चिरंजीव अमित यांचा विवाह संपन्न झाला.
कन्या पाहण्यासाठी हणमंत शंकरराव तावरे [बाबा] दादासो आप्पासो तावरे [पाटील] सचिन अरुण गव्हाणे ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे शामराव वसंतराव तावरे पोपटराव सोनटक्के धनंजय सोनटक्के यांनी ठाम भूमिका घेऊन दोन्हीही कडील मंडळींना सध्य परिस्थिती समजावून विवाह उरकण्याचा प्रस्ताव मांडला .अवघ्या दोन तासांत वैदिक पध्दतीने विवाह सोहळा पार पाडून कमी लोकांत खर्चाला फाटा मानपान बाजूला ठेऊन विवाह उरकला.
विवाहात पुरोहिताचे काम प्रा.रवींद्र कोकरे यांनी पार पाडले.कोरोनाच्या काळात १३विवाह पार पाडून सामाजिक कार्य सुरु आहे.व्याख्यानात मांडलेले विचार प्रत्यक्ष अंमलात आणून कृतीतून सिद्ध केले.ही चळवळ काळाची गरज असून साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाले पाहिजेत असे प्रा.रवींद्र कोकरे यांनी केले.