स्थैर्य, फलटण दि. ११ : फलटण तालुक्यात 80 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होत आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायत व प्रभाग बिनविरोध झालेल्या आहेत. या बिनविरोध निवडी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या उमेदवारांच्याच झालेल्या आहेत. याचप्रकारे उर्वरित ठिकाणी देखील मतदारांनी जागृत राहून राजे गटाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देवून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाला आपला ठाम पाठींबा दर्शवावा. राजे गटाने उभे केलेल्या सर्व उमेदवारांना या निवडणूकीत विजयी करुन आपल्या गावात सुरु असलेली विकासकामे अखंड सुरु ठेवण्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक 3 मधील अधिकृत उमेदवार संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण यांच्या प्रचारार्थ आमदार दीपक चव्हाण बोलत होते.
ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आजवर फलटण तालुक्याचा विकास झाला आहे. विकासाची गंगा अविरत ठेवण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ‘राष्ट्रवादी’ पुरस्कृत उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी मतदारांना केले.