
दैनिक स्थैर्य । 17 एप्रिल 2025। फलटण । सध्याच्या काळात व्यवसाय करताना ग्राहक कोणत्या जातीचा धर्माचा आहे हे पाहत नाही. त्याचप्रमाणे समाजाने जाती धर्म विरहित मानवतेचा दृष्टिकोन ठेवून पहावे. तेव्हाच महामानवांना अभिप्रेत असणारी समाज निर्मिती होईल, असे मत धैर्य फाउंडेशनचे संस्थापक सचिन मोरे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती समारंभात ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य वर्धमान अहिवळे, माजी नगरसेवक अनुप शहा, श्रीकांत सुर्वे, भरतेश राव, सौ. राव, फलटण बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. बापूसाहेब सरक, अॅड. प्रशांत निंबाळकर, ज्ञानेश्वर कोरडे, श्रीमती सुषमा काटे, संजय जाधव, सागर जाधव, मुख्याध्यापिका विश्रांती साबळे, अमोल कुमठेकर, अॅड. राजेंद्र ढेंबरे, गणेश जाधव, अॅड.मीना सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
सचिन मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी विशिष्ट एका जाती धर्म करता काम न करता मानव जातीच्या कल्याणासाठी काम केले आहे. या महामानवांनी दिलेले संदेश आज आपण अंगीकृत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य वर्धमान अहिवळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना समान हक्क दिल्याचे सांगून मजूर कायदे, महिलां विषयक कायदे, याची माहिती करुन दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सौ. प्राजक्ता अहिवळे व सौ अश्विनी अहिवळे यांनी त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेतली. अॅड. सौ.मीना सुर्वे आभार यांनी मानले. डॉ.आंबेडकर चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.