’आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ कार्यशाळेचे आयोजन

माजी नगरसेवक रविंद्र भारती यांची माहिती


स्थैर्य, सातारा, दि. 11 ऑगस्ट : ‘भारती फाउंडेशनच्या वतीने ’आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ ह्या मुलांच्यासाठी गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार, दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत, सातारा शहरातील शाहु उद्यान, गुरुवार बाग येथे करण्यात येणार असल्याची माहीती भारती फाउंडेशनचे प्रमुख, माजी नगरसेवक रविंद्र भारती यांनी दिली.

लहान मुलांना मातीत खेळण्याचा आनंद आणि त्याच बरोबर त्याच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून गेल्या दोन वर्षापासून कलाकारी टिमकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, हे उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.

गेली दोन वर्ष या उपक्रमास उदंड असा प्रतिसाद लाभला होता. या वर्षी सहभागी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिल्पकार पुरस्कार उपविजेता मंदार लोहार, सातारा शहरातील सुप्रसिध्द मुर्तीकार पोपट कुंभार, महेश लोहार हे गणपती बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शाडू माती, गणपती बनविण्याचे बेस पॅड, व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आहवान आयोजकांनी केले आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ड. शुभम तंटक यांच्याशी 9421576448 नंबरवर संपर्क साधावा. सदर कार्यक्रमासाठी हरिओम ग्रुप, टिम कलाकारी व भारती फाउंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!