स्थैर्य, फलटण : छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठा नाही. शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असल्यामुळे त्यांचा दिल्लीच्या संसदेत सुद्धा जयघोष झाला पाहिजे. जय भवानी, जय शिवराय…!! घोषणा दिल्यानंतर ज्या शिवद्रोह्याना पोटात आग लागली, त्यांना समाज कधीही माफ करणार नाही जे व्यंकय्या नायडू संसदेच्या सभागृहांमध्ये सर्वोच्च खुर्चीवर बसले आहेत ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन म्हणून छत्रपतींचा आणि त्यांच्या वंशजांचा अपमान केल्याप्रकरणी व्यंकय्या नायडू व इतर नेत्यांनी महाराष्ट्रासह देशाची माफी मागितली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका असल्याचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे
रायगडावर जाऊन छत्रपतींच्या समाधीसमोर नाक घासलं गेलं, छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ…! अशी घोषणा देऊन छ. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन महाराष्ट्रात भाजपने मतांची भीक मागितली आणि त्याच मतांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असल्याचे नमूद करीत छत्रपती किंवा छत्रपतींच्या वंशाचा अपमान संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नसल्याचे विशाल शिंदे यांनी सांगितले आहे.
संसदेचे सभागृह ज्या जागेवर उभे आहे, ती जागा सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दान केलेली जमीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे दान केलेल्या जमिनीवरील सभागृहात छत्रपतींचा अपमान हा शिवद्रोह आहे, म्हणून या विरोधात संभाजी ब्रिगेड फलटण, सातारा जिल्ह्याच्या वतीने ‘१ लाख पत्र’ मा. व्यंकय्या नायडू यांना आम्ही पाठवणार असल्याचा निर्धार विशाल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
पत्र पाठवताना… संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, सरचिटणीस प्रदीप घाडगे, तालुकाध्यक्ष विनीत शिंदे, सुबोध शिर्के, दत्ता पवार, पंकज शिर्के, संकेत शिर्के सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजितकुमार जाधव आदी उपस्थित होते.