
स्थैर्य, सातारा, दि. 10 डिसेंबर : सातारा येथे होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूहाने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण सायंकाळी 5 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार असल्याची माहिती आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख डॉ संदीप श्रोत्री यांनी दिली
बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कूपर कार्पोरेशनचे मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे,माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम ,सातारा येथे होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . महिला उद्योजिका क्षमा जोशी, शिरिष चिटणीस, श्रीराम नानल,मुकुंद फडके विशेष उपस्थित राहणार आहेत.
लहान गट,मोठा गट,महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा प्रकारे झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सर्व गटात मिळून एकूण सातशे स्पर्धक होते सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सर्वात जास्त प्रतिसाद होता. तसेच बारामती, फलटण,जुन्नर, उदगीर,उमरगा, नाशिक येथून निबंध आले होते परीक्षक म्हणून अशोक वाळिंबे,हे गो देशपांडे,डॉ अदिती काळमेख,प्रा वि ना लांडगे,रामभाऊ आफळे,क्षितिजा क्षीरसागर,गीता श्रोत्री यांनी काम पहिले
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट :
- श्रीराज पांडुरंग पवार श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल, धावडशी 5 वी प्रथम
- आराध्या अजित शिंदे श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय, पाटखळ 7 वी द्वितीय
- अर्णिका सचिन चौधरी न्यू इंग्लिश स्कूल, सातारा 7 वी तृतीय
- दिशा गणेश सावंत लोकमंगल हायस्कूल,एमआयडीसी,सातारा 7 वी उत्तेजनार्थ
- शुभ्रा प्रमोद पोळ अभिनव विद्यामंदिर, शाहूपुरी, सातारा 5 वी उत्तेजनार्थ
- श्रेया सुनील कोदारी हिंदवी पब्लिक स्कूल, सातारा 7 वी उत्तेजनार्थ
- वैशाली राजपाल पवार लोकमंगलहायस्कूल,एमआयडीसी,सातारा 6 वी उत्तेजनार्थ
- वेदिका दादासो नागरगोजे न्यू इंग्लिश स्कूल, सातारा 7 वी उत्तेजनार्थ
- रुद्र सोमनाथ माने अभिनव विद्यामंदिर, शाहूपुरी, सातारा 7 वी उत्तेजनार्थ
- प्रांजली सुनील पवार मु. पो. वर्णे, सातारा उत्तेजनार्थ
मोठा गट
1 सेजल वाघमळे कन्याशाळा, सातारा 10 वी प्रथम
2 पूर्व संकपाळ कन्याशाळा , वाई 10 वी द्वितीय
3 अंजली नलवडे लोकमंगल हायस्कूल,एमआयडीसी,सातारा 10 वी तृतीय
4 आशुतोष फडणीस न्यू इंग्लिश स्कूल, सातारा 10 वी उत्तेजनार्थ
5 वृषाली रोमण कन्याशाळा, सातारा 10 वी उत्तेजनार्थ
6 नंदिनी सुरेकर श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय, पाटखळ 10 वी उत्तेजनार्थ
7 राजनंदिनी तडाखे लोकमंगल हायस्कूल,एमआयडीसी,सातारा 10 वी उत्तेजनार्थ
8 स्वराली कदम मुधाई देवी विद्यामंदिर, देऊर 9 वी उत्तेजनार्थ
9 कल्याणी पवार श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल, धावडशी 9 वी उत्तेजनार्थ
10 सई ढेकणे धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव 9 वी उत्तेजनार्थ
महविद्यालय गट
- श्रावणी तानाजी पवार राजा भगवंतराव ज्युनि कॉलेज, औंध 11 वी अ प्रथम
- वैभव सुनील पवार लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा बी ए मराठी द्वितीय
- सलोनी सुनील सरतापे किसनवीर महाविद्यालय वाई, 11 वी तृतीय
- आशिष सतीश निकम लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा बी ए मराठी उत्तेजनार्थ
- विश्वकर्मा सोनल विजयप्रकाश तुळजाराम चतुरचंद महा., बारामती, 11 वी उत्तेजनार्थ
- प्रणव मारुती निर्मळ अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर उत्तेजनार्थ
- कोमल वसंत आठवे महात्मा फुले ज्यू कोलेज ऑफ एज्युकेशन , सातारा उत्तेजनार्थ
- वैष्णवी संभाजी जगताप मा. कृ माने कनिष्ठ महाविद्यालय, देऊर उत्तेजनार्थ
- सिद्धी सागर लोहार मा. कृ माने कनिष्ठ महाविद्यालय, देऊर उत्तेजनार्थ
खुला गट
- अश्विनी अवधूत फडणीस शनिवार पेठ, सातारा प्रथम
- राजेंद्र संपतराव पवार तळमावले, पाटण, जि सातारा द्वितीय
- विजयकुमार रामचंद्र काळे हिंगणी, धुळदेव, ता माण, जि सातारा तृतीय
- लक्ष्मी विजय लोहार उंब्रज, ता कराड, जि सातारा उत्तेजनार्थ
- विद्या सागर उकिर्डे उंब्रज, ता कराड, जि सातारा उत्तेजनार्थ
- ज्योती (मनीषा) संजय पाटील तळमावले, पाटण, जि सातारा उत्तेजनार्थ

