सत्ताधार्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम आम्ही सक्षमपणे केले : समशेरसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषेदेमध्ये फलटण शहराचा सर्वोतपरी विकास करण्यासाठी आम्ही कायमच सत्ताधारी मंडळींना साथ दिली आहे. यासोबतच सत्ताधारी जर शहराच्या विकासाच्या ऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी करत असतील तर त्यांना सक्षमपणे विरोध करण्याचे काम आम्ही सर्व विरोधी नगरसेवकांनी केलेले आहे. फलटण नगरपरिषदेकमध्ये एक प्रकारे आम्ही सत्ताधारी मंडळींवर अंकुश ठेवण्याचे काम गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले आहे, असे मत फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथील समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले कि, फलटण नगरपरिषदेमध्ये आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून कामकाज केलेले आहे. आमच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये साधारण सन २०१९ पासून कोरोना ह्या वैश्विक महामारीचा आपण सर्वजण सामना करीत आहोत. ह्या दोन ते तीन वर्षांमध्ये फलटण शहरातील नागरिकांची कोरोनाच्या निमित्ताने आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. फलटण येथे शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या साठी आम्ही निःशुल्क स्व. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नावाने सर्व सोयी सुविधा युक्त हॉस्पिटल सुरु केले. व सदरील हॉस्पिटलचा फायदा हा फलटण शहरासह तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना झालेला आपल्याला पाहायला मिळाले आहे.

आम्ही आमच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये फलटण शहरातील नागरिकांच्या साठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तर फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कार्यरत होतो. फलटण शहरातील नागरिकांच्यासाठी आम्ही वेळोवेळी विविध आंदोलने छेडली व वेळप्रसंगी आम्ही न्यायालयीन लढा सुद्धा दिला आहे. फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जर जनतेच्या हिताच्या ऐवजी सत्ताधारी गटाच्या हिताचे विषय आणले तर आम्ही त्या वेळी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तक्रारी सुद्धा केल्या आहेत. परंतु जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दबावापोटी आमच्या तक्रारींचे योग्य ते निरसन केलेले नाही, असे मत यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.

फलटण शहरामधील सर्वसामान्य गरीब नागरिकांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जण कार्यरत राहिलो आहोत. कोरोना सारखा महाभयंकर आजार, डेंग्यू व मलेरिया या आजरांची मोठी साथ असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वखर्चाने आम्ही सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन स्वच्छता व निर्जंतुकीकरण केलेले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वखर्चानेच आम्ही कोरोना कालावधीमध्ये फलटण मधील गरीब व गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य किट्सचे वाटप केलेले आहे. ह्यासोबत फलटण शहराच्या विकासासाठी आम्ही कायमच आग्रही राहिलो आहे व ह्या पुढेही आम्ही आग्रहीच असू, असे मत माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी व्यक्त केले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये पूर्व करण्यात आलेल्या व सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती केंद्रीय दिशा समितीचे सदस्य व माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!