आम्हीही या देशाचे आहोत, आमचीही गणना करा; गोपीनाथ मुंडेंचा व्हिडिओ केला पोस्ट मुंबई40 मिनिटांपूर्वी


स्थैर्य, दि.२४: आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाचा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली आहे. रविवारी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून ही मागणी केली आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओसोबत पंकजा मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!