देवाच्या पालखीचे मानकरी व गुलाल, भंडार खोबरे उधळणा-या हातापरीस मदतीचे हातच भारी मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.
पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला. “यापेक्षा” किती जीवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते.
माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसे, तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धावून जात नाहीत…….??
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत. खरतर आजकालच्या या खोटा दिखाव्याच्या शर्यतीत, तू मोठा की मी मोठा ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्या पायी, माणूस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय, म्हणुनच बोलतोय जीवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या, एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या.
झालं गेलं विसरून, तुझं माझं सोडून माणूस व्हा