
दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२५ । जावली । अजिंक्य आढाव । तरुणांच्या रोजगाराच्या समस्या असतिल रस्ते विकास, दवाखाने, विद्युत समस्या असतिल अशा मुलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांंची अडचणी येत आहेत.
येथील संजय आनंदराव मोरे यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या घेतली भेट घेत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.
पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेताना राम चौधर, संदीप चौधरी, दत्तात्रय देवकाते – पाटील या वेळी उपस्थित होते.
फलटण व परिसरात होत असलेल्या नागरिकांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी तालुक्यातील तरुणांनी एकत्रित येण्याचे आवाहन करत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कटिबद्ध असल्याचे सुद्धा खासदार शरदचंद्र पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.