‘आम्ही पुस्तक प्रेमी’ समूहाचे रविवारी स्नेहसंमेलन

रंगनाथ पठारे, मिलिंद जोशी,उदय निरगुडकर यांची उपस्थिती


स्थैर्य, सातारा, दि. 19 सप्टेंबर : येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे तृतीय वार्षिक संमेलन ‘वाचू आनंदे’ रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे

संमेलन स्थळाला ‘कै यशवंत दिनकर पेंढारकर साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असून सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या कालावधीमध्ये विविध साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी आहे.
या संमेलनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख आणि ज्येष्ठ लेखक साहित्यिक डॉ संदीप श्रोत्री, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सविता कारंजकर करणार आहेत.
त्यापूर्वी सकाळी नऊ ते दहा या कालावधीमध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सीमंतिनी नुलकर असतील तर डॉ. क्षितिजा पंडित सूत्रसंचालन करतील. यामध्ये सविता कुरुंदवाडे, योगिता राजकर, शिल्पा चिटणीस, डॉक्टर नीता कुलकर्णी, वैशाली राजमाने, मकरंद गोंधळी, शुभदा कुलकर्णी हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
दुपारी साडेअकरा ते साडेबारा या कालावधीमध्ये ‘सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान’ हा परिसंवाद होणार असून त्याच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या प्रमुख कार्यवाह सौ. सुनीताराजे पवार असतील. या परिसंवादांमध्ये श्रीकांत कात्रे, डॉक्टर नरेंद्र कदम, अशोक वाळिंबे सहभागी होणार असून डॉ. मेधा क्षीरसागर परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील.

दुपारी साडेबारा ते दीड या कालावधीमध्ये ‘चित्रपटातील साहित्यिक मूल्य’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर निर्मोही फडके असतील. या परिसंवादांमध्ये मुकुंद फडके, जयदीप पाठकजी,शिरिष चिटणीस यांचा सहभाग असेल या परिसंवादाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत करणार आहेत.

दुपारी दोन ते तीन या कालावधीमध्ये ‘माझे लेखन’ या उपक्रमाअंतर्गत कल्याणी थत्ते,राजेंद्र घाडगे, सुनील शेडगे, प्राध्यापक विश्वजीत जाधव, दीपक कुलकर्णी, सौ राजश्री शहा, मधुसूदन नेने, प्रदीप कांबळे आपल्या लेखन विषयक कामगिरीची माहिती देतील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा देशमुख करणार आहेत.

दुपारी तीन ते चार या कालावधीमध्ये ‘माझे वाचन’ या उपक्रमांतर्गत नीलाक्षी काळे, विशाल देशपांडे, डॉ अंजली मणेरीकर, डॉ. रुपाली अभ्यंकर, वैदेही कुलकर्णी रवींद्र खंदारे, संध्या चौगुले, डॉ. अपर्णा सदावर्ते, रागिणी जोशी, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ आपल्या वाचनाची माहिती देतील. या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया भिडे करतील.

संमेलनाचा समारोप दुपारी चार वाजता होणार असून त्यावेळी जेष्ठ माध्यमतज्ञ आणि लेखक डॉ. उदय निरगुडकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते ‘मराठी साहित्यापुढील आव्हाने धोके आणि संधी’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतील. प्रमुख पाहुणे म्हणून स्वयंटॉक्सचे संचालक नवीन काळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुहास जोशी करणार आहेत.

या स्नेहसंमेलनाचे समन्वयक मुकुंद फडके असून साहित्यिक रसिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, श्रीराम नानल, विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!