वझीरएक्सने ‘क्विकबाय’ लाँच केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ३० : भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने क्रिप्टो खरेदी करण्याचा अखंड अनुभव प्रदान करण्यासाठी ‘क्विकबाय’ ही नवीन सुविधा लाँच केली आहे. भारतात प्रत्येकाला क्रिप्टो उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेअंतर्गत नव्या क्रिप्टो गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार वन-टॅप क्रिप्टो व्यवहारांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरक्षित क्रिप्टो ट्रेडिंग प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच भारतीय लोकांना फिनटेकच्या या नव्या पैलूची ओळख करून देण्याचा उद्देश यामागे आहे.

क्विकबायसारखे फीचर ही काळाची गरज असून याद्वारे क्रिप्टोचा स्वीकार आणि लोकांमधील दरी सांधली जाईल. भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचे यूझर्स १ दशलक्षांवरून २ दशलक्षांपर्यंत वाढवले आहेत. ही आकडेवारी जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ यादरम्यानची आहे. एप्रिल २०२१ मध्ये आणखी एक दशलक्ष यूझर्स वाढले. क्विकबायद्वारे वझीरएक्सला या तिमाहित आणखी १० दशलक्ष यूझर्सची नोंदणी करण्याचा उद्देश आहे.

वझीरएक्सचे संस्थापक आणि सीईओ निश्चल शेट्‌टी म्हणाले, “वझीरएक्समध्ये ग्राहकांशी खरेपणाने वागणे आणि भारतात सर्वांसाठी क्रिप्टो उपलब्ध करून देणे, ही आमची प्राथमिकता आहे. वापरास सुलभ असे इंटरफेससह कमी विस्तारासह, रुपयातील सर्वोच्च तरलता ही बाजारात आधीपासूनच अतुलनीय आहे. हे घटक ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. क्विकबायसारखी सुविधा उपलब्ध करून आम्हाला ग्राहकांचा अनुभव आणखी वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे. याद्वारे भारतातील क्रिप्टो व्यवहार अधिक सुलभ होतील. त्यामुळे हजारो लोक यात सहभागी होतील.”

कोव्हिडमुळे आलेला जॉब मार्केटमधील ट्रेंड मोडून काढण्यात यशस्वी ठरलेल्या मोजक्याच संस्थांमध्ये वझीरएक्सचा समावेश होते. येथील आकडेवारी वर्षअखेरीस तिपटीने वाढेल. या प्लॅटफॉर्मने नुकतेच मासिक ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये ३ दशलक्षांचा आकडा पार केला असून २.४ अब्ज डॉलर्सचा निधी जमवला आहे.


Back to top button
Don`t copy text!