कासचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार


दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। सातारा। कास येथील पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी पालिकेच्या वतीने नवीन वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, ही वाहिनी तलावाच्या भिंतीत असणार्‍या आउटलेटला जोडण्याचे काम होणार असून, यासाठी त्याठिकाणचा उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ता. 23, 24 आणि 25 रोजी या योजनेवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तलावाच्या भिंतीतील आउटलेटला वाहिनी जोडण्याचे काम शुक्रवारी (ता. 23) सुरू होणार असून, त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे त्यादिवशी तसेच शनिवारी (ता. 24) सायंकाळच्या सत्रात होणारा पोळवस्ती, कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळेवस्ती, जांभळेवाडा तसेच कात्रेवाडा टाकीच्या माध्यमातून होणार्‍या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचबरोबर शनिवारी (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) कास योजनेवरील सकाळच्या सत्रातील यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ या भागातील तसेच कात्रेवाडा, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकीच्या माध्यमातून होणार्‍या पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!