दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग अथवा इतर कोणत्याही विभागाचे लाईट बिल थकित नाहीत. पाणीपुरवठा विभागामध्ये मीटर बदलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात लाईट कनेक्शन काढण्यात आले होते व ते तातडीने पुन्हा बसविण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केलेले आहे.