शाहूनगर भागात पाणीपुरवठा विस्कळित


स्थैर्य, सातारा, दि.27 ऑक्टोबर : शाहूनगर वासीयांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला नागरिकांना टँकरने पाणी आणावे लागले. त्यामुळे नागरिक जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर त्रस्त झाले आहेत. शाहूनगर भागामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सतत विस्कळित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांना वीज वितरण कंपनीमध्ये एक्स्प्रेस फिडरवरून लाइन देण्यात यावी, यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले; परंतु वेळकाढू वृत्तीमुळे जीवन प्राधिकरणाच्या पंपिंग स्टेशनवरील वीज वारंवार जात असते. यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पंपिंग स्टेशनवरील वीज सुरळीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.जाते. जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीतील या समन्वयाच्या अभावामुळे शाहूनगरवासीयांचे हाल होत आहेत.अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले यांनी दिला आहे.
शाहूनगरवासीयांच्या वतीनेजीवन प्राधिकरणाला यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली, तसेच आंदोलनाचे इशारेही देण्यात आले आहेत. जीवन प्राधिकरणाच्याअभियंत्यांशी संपर्क साधूनही पंपिंग स्टेशनला लाइट नसल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरत नाहीत, हेच कारण वारंवार ऐकायला मिळत आहे. याव्यतिरिक्त कर्मचारी संपावर असणे, वॉल लिकेज, मोटर बिघडणे, मेनपाइप लिकेज असणे यासारखी कारणेही दिली जातात.

पंपिंग स्टेशनवरील वीज गेल्यामुळे दररोजच्या वेळापत्रकात तीन ते चार तासांचा विलंब होतो. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडून जाते, असे प्राधिकरणचे अधिकारी सांगतात. वीज वितरण कंपनीकडून आमचा कोणताही प्रॉब्लेम नाही, असे स्पष्टीकरण दिले
जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनी यांच्यातील घोळ जोपर्यंत मिटत नसल्याने शाहूनगरचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कितीही टोकाचे आंदोलन करावे लागले, तरी मागे हटणार नाही, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. शाहूनगर भागातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!