
दैनिक स्थैर्य । 1 जून 2025। फलटण । बाणगंगा धरण माळवाडी येथे आज रविवार दि. 1 जून रोजी दुपारी 1 वाजता आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते जलपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.