साताऱ्याच्या उपनगरांमध्ये पाण्याचा ठणठणाट; विसावा जलशुध्दीकरण केंद्रात तातडीची दुरुस्ती मोहिम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । सातारा । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा जलशुध्दीकरण केंद्राच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने साताऱ्यालगतच्या उपनगरांना शनिवारी पाणी पुरवठा झाला नाही . त्यामुळे गोडोली ते पोवई नाका तसेच करंजे ते शाहूपुरी या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. परिणामी नागरिकांना खाजगी टँकरचा आधार शोधावा लागला.

विद्युत रोहित्राचा अचानक वीज भार वाढल्याने मंगळवारी रात्री दहा वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा जलशुध्दीकरण केंद्रात ट्रान्सफॉर्मर अचानक ठिणग्यांचा जाळ होऊन ती यंत्रणाच बंद पडली. त्यामुळे पुढील बारा तास पाणी उपसाच होऊ न शकल्याने प्राधिकरण कार्यक्षेत्रातील गोडोली पोवई नाका करंजे व शाहूपुरी या क्षेत्रांना पाणी पुरवठा करणाऱ्या नऊ साठवण टाक्यांना पुरेशी पाण्याची पातळी मिळू शकली नाही. परिणामी संपूर्ण शाहूपुरी, करंजे म्हसवे रोड, मनिषा कॉलनी सदर बझार गोडोली, शाहूनगर, तामजाई नगर दौलत नगर, गणेश व भैरवनाथ कॉलनी या भागाला शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा झाला नाही.

परिणामी नागरिकांची प्रचंड गैरसोय झाल्याने खाजगी टॅंकरना पाचारण करण्याची वेळ आली. पालिकेचे पाण्याचे टॅंकर शनिवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही. शहराच्या पूर्व भागात पाण्याचा ठणाणा झाला. प्राधिकरणाच्या मेंटेनन्स विभागाने मंगळवारी रात्रीपासूनच दुरूस्ती मोहिम हाती घेउन ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती केली मात्र त्यामध्ये बारा तासाची घंटेवारी वाया गेली. रविवारी पाणी पुरवठा सुरळीत होईलच मात्र तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!