फक्त २० मिनिटांच्या पावसात फलटण शहरातील दुकानांमध्ये शिरले पाणी; रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे व्यापार्‍यांच्या मालावर फिरतेय पाणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटणमध्ये आज दुपारी फत वीस मिनिटेचा पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे डेक्कन चौकात असलेल्या सगळ्या दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील विनय कॉम्प्लेक्स पाणीच पाणी झाल्याने येथील व्यापार्‍यांची आपले दुकानातील साहित्य भिजण्यापासून वाचविण्यासाठी त्रेधातिरपीट उडाली. या ठिकाणची परिस्थिती रोडच्या कामामुळे झाली असल्याचा आरोप येथील व्यापार्‍यांनी केला आहे.

या पावसात मेटकरी गल्ली येथील रस्त्यावर पावसाचे पाणीच पाणी झाले होते. गतवर्षी फलटणमध्ये भुयारी गटराची मोठी योजना संपन्न झाल्यामुळे पावसाचे पाणी वगळता इतर पाणी या गटारातून जाते, असा टोमणा येथील नागरिक व व्यापार्‍यांनी मारला.

फलटण शहरामधील नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, डेक्कन चौक, रिंग रोड यासह मेटकरी गल्ली सुपर मार्केट या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर व दुकानांमध्ये आल्याने अनेक अडचणींचा सामना फलटणकर नागरिकांना करावा लागला. फलटण शहरामध्ये फक्त वीस मिनिटे मुसळधार पाऊस पडल्याने जर ही अवस्था होत असेल तर एखादा मोठा पाऊस जर फलटण शहरात झाला तर काय अवस्था होईल, याचा विचार न केलेलाच बरा.

फलटण नगर परिषदेने नक्की काय उपाययोजना केल्या आहेत की नाही, असा सवालसुद्धा नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे.


Back to top button
Don`t copy text!