मंगल कार्यालयाचा वॉचमन मारहाणीत जखमी


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | नागठाणे | मंगल कार्यालयाचे गेट न उघडल्याने एकाने दारूच्या नशेत डोक्यात दगड मारून वाँचमनला गंभीर जखमी करण्याची घटना नागठाणे(ता.सातारा) येथील मंगल कार्यालयाच्या गेटवर घडली.

रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून आधिकाराव रामचंद्र उंबरे (वय.५२,रा.बोरगाव, ता.सातारा) असे जखमी वॉचमनचे नाव आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी अक्षय ढाणे (संपूर्ण नाव समजू शकले नाही. रा.नागठाणे, ता.सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधिकाराव उंबरे हे नागठाणे-सासपडे रोडवरील एका मंगल कार्यालयात वाँचमन म्हणून कामाला आहेत. रविवारी रात्री ११ च्या सुमारास हॉलच्या पाठीमागे रहावयास असलेला अक्षय ढाणे हा दारूच्या नशेत गेटवर आला. त्याने वॉचमनला गेट उघडण्यास सांगितले. मात्र वॉचमनने ‘तुम्ही दारू पिलेला आहे’ असे सांगून गेट उघडण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या अक्षय ढाणे याने गेटजवळील दगड उचलून आधिकाराव उंबरे यांना मारला. दगड डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना समजल्यावर त्यांनी जखमी आधिकराव उंबरे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचारानंतर आधिकराव उंबरे यांनी सोमवारी बोरगाव पोलीस ठाण्यात अक्षय ढाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!