
स्थैर्य, सातारा, दि. ०३ : जिल्ह्यात करोना आजाराचे रुग्ण गेले आठ दिवसात सातत्याने वाढत आहेत मात्र समाज माध्यमातून काही लॉक डाऊन बाबत अफवा पसरवल्या जात आहेत .यामध्ये शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे अशी अफवा सध्या समाज माध्यमात शुक्रवारी दुपारी पसरवली जात आहे तरी असा कोणताही लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे .
सातारा जिल्ह्यात करोना आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 1188 रुग्ण बाधित असून त्यातील 49 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर आत्ता सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयात 360 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत आजपर्यंत 779 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिन्हा यांनी दिलेली आहे त्यामुळे शनिवारी पासून लॉकडाऊन जाहीर केलेला नाही तरी लोकांनी जीवनावश्यक वस्तू तसेच फळे भाज्या घेण्यासाठी गर्दी करू नये दरम्यान सातारा शहरातील भाजी मंडई व फळ बाजार पुढील निर्णय देश कवर बंद ठेवण्यात आलेला असला तरी लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.