स्थैर्य, कोळकी : भारतातही कोरोना व्हायरस संसर्गाचे हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घाला, अशी आग्रही सूचना केली आहे. भारतासह जगभरात मास्क घालण्याविषयी नियमावली तयार करण्यात आली आहे. तर मास्क घालावा की नाही, याबाबत मार्गदर्शक सूचना तज्ज्ञ सल्लागारांनी युके सरकारकडे पाठवल्या आहेत. The Scientific Advisory Group for Emergencies (Sage) या सल्लागारांच्या एका गटाने यरोपमधल्या मास्क वितरण आणि सुरक्षेविषयीचा अभ्यास केला आहे. कोळकी मध्ये बहुतांश भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांकडून तकलादू उपाययोजना केल्या जात असून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तरी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्वतः लक्ष घालून कोळकी ग्रामपंचायतीला ठोस उपाययोजना करण्यास भाग पाडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे कोळकी येथील युवा नेते जयकुमार शिंदे यांनी केलेली आहे.
भाजपचे नेते जयकुमार शिंदे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे सदस्य अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांच्यासह पै. बाळासाहेब काशिद, संदिप नेवसे, यशवंतराव जाधव, राजेंद्र पोरे इत्यादी उपस्थित होते.
कोळकी मध्ये अनेक ग्रामस्थांसह काही सदस्य व कर्मचारी अजून विना मास्क फिरत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. याबाबत आता उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्वतः लक्ष घालावे. जे ग्रामस्थ नियमांचे पालन करत नाहीत अशांच्या सर्व शासकीय सोयी-सवलती, सुविधा बंद कराव्यात. सरपंच, सदस्य, कर्मचारी ये-जा करतात परंतु कोणाचेही लक्ष नाही. यामुळेच आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच जागोजागी व रिकाम्या प्लॉटमध्ये झाडेझुडपे व गवत वाढले आहे. परंतु ग्रामपंचायत मात्र सुस्त आहे याकडे आता उपविभागीय अधिकार्यांनीच लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली आहे.