आटपाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । आटपाडी । आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धामच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती, साफसफाई करण्यात यावी व सदर वास्तूचा सामाजिक कार्यासाठी वापर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन हे दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. सदर बचत भवनास विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. परंतु सदर वास्तूची हेळसांड करण्यात आलेली आहे. सदर वास्तुस रंगरंगोटी नाही. काचा फुटलेल्या आहेत. आतील लाईट नादुरुस्त आहेत. सदर वास्तूत व परीसरात घाणीचे साम्राज्य आहे. साफसफाई केली जात नाही. तेव्हा सदर बचत धामची सत्वर दुरुस्ती, साफसफाई व रंगरंगोटी

करण्यात यावी अशी विनंती समस्त मागासवर्गीय समाज्याच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच सदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धामच्या इमारतीची देखभाल दुरस्ती करून सदर वास्तूची इमारत ही लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठका या बाबीसाठी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात यावी. सदर बचत धामची इमारत दुर्लक्षित न ठेवता सत्वर साफसफाई व इतर बाबी करणेत याव्यात. अन्यथा आटपाडी तालुक्यातील तमाम मागासवर्गीय बांधव आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन उभे करतील याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी विलास खरात, आप्पा खरात, मोहन खरात, मोटे, बाबूराव प्रभाकर खरात, गजेंद्र चव्हाण, राजेंद्र सावंत, विकास खरात, रवि लांडगे, शहाजी भिसे, दादा कदम, सोमेश खरात आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!