
स्थैर्य, दि. २३ : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने अचानक हटवला होता. हा पुतळा 24 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत पुन्हा न बसवल्यास कर्नाटकात घुसण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
पुतळा न बसवल्यास कवळी कट्टी ते मनगुत्तीपर्यंत दांडी मार्च काढण्यात येईल असं शिवसेनेने म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांच्या मनगुत्ती येथील पुतळ्याचं अनावरण काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. पण पंधरा दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने हा पुतळा हटवल्यानंतर इथलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना पत्र लिहून पुतळा तातडीने बसवण्याची मागणी केली होती.
यानंतर गावात बैठका होऊन पुतळा बसवण्याचं आश्वासन देण्यात आलं तरी अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.