अखेरच्या कसोटीसाठी वॉर्नर, पुकोवस्की ऑस्ट्रेलिया संघात, सात जानेवारीपासून तिसरी कसोटी सिडनीत होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.३१: भारताविरुद्ध अखेरच्या २ कसोटीत डेव्हिड वॉर्नरचे ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले. दुखापतीमुळे तो पहिल्या २ कसोटीत खेळू शकला नाही. तसेच १८ सदस्यीय संघात २२ वर्षीय विल पुकोवस्की व सीन अॅबॉटचा समावेश करण्यात आला. पुकोवस्की भारताविरुद्ध सराव सामन्यादरम्यान जखमी झाला होता. तिसऱ्या कसोटीत वॉर्नर आणि पुकोवस्की जोडी सलामी देऊ शकतात. पहिल्या दोन कसोटीच्या चार डावांत ६३ धावा करणारा सलामीवीर जो बर्न्सला बाहेर करण्यात आले. कोरोनानंतर त्याने १३ डावांत केवळ ३०+ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने पहिल्या कसोटीत १६ व ७० धावांची भागीदारी केली. दुसऱ्या कसोटीत या जोडीने केवळ १० व ४ धावांची सलामी दिली. ४ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे.

मेलबर्नमध्ये खेळाडूंचा सराव, 4 जानेवारीपर्यंत सिडनीत प्रवेश नाही : तिसऱ्या कसोटीला ७ जानेवारी रोजी सिडनीत सुरुवात होईल. खेळाडूंना ३१ डिसेंबरपर्यंत सिडनीत दाखल व्हायचे होते. तेथे काेरोनाच्या रुग्णात सतत वाढ होत आहे. त्यामुळे संघ आता मेलबर्नमध्ये सराव करतील.


Back to top button
Don`t copy text!