
दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । सातारा । दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसापूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा करून त्याचा टीझर लाँच केला होता या चित्रपटात प्रतापराव गुजर यांचे गाव भोसरे ( खटाव ) असताना कोकणातील गाव दाखवण्यात आले आहे तसेच प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे असून त्यांची देहबोली प्रतापरावांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेशी अजिबात जुळत नाही त्यांचा पेहराव सुद्धा दरोडेखोरासारखा दाखवण्यात आला आहे मांजरेकरांनी या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतीकरण केले आहे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही जर या चित्रपटाला प्रदर्शित होण्याची परवानगी मिळाली तर ते अन्यायकारक आहे इतिहासाचे विकृतीकरण त्यांनी तातडीने थांबवावे अन्यथा शिवप्रेमींच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे आणि भोसरे ग्रामस्थांचे वतीने प्रतापराव गुजर यांची वंशज गुजर यांनी दिला आहे.
सुरेश गुजर पुढे म्हणाले महेश मांजरेकर यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात इतिहासाचे विद्रूपीकरण केले आहे .ऐतिहासिक चित्रपट म्हणजे मुळशी पॅटर्न बनवणे इतका सोपा नाही खरा इतिहास जर दाबला जाणार असेल तर त्या चित्रपटांना अर्थ नाही भोसरे हे खटाव तालुक्यातील प्रसिद्ध क पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे गाव आहे त्या जागी जर कोकणातील गाव दाखवले जात असेल तर सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचे किती विकृतीकरण केले जात आहे . इतिहासामध्ये प्रतापराव यांच्या सोबतीने विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर ,सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे ही हुतात्म्यांची नावे आहेत ्यांची नावे डालून दत्ताजी पागे जिवाजी पाटील चंद्राजी कोठार मल्हारी लोखंडे सूर्याचे दांडकर आणि तुळजा जामकर ही काल्पनिक नावे घेण्यात आली आहेत . ही इतिहासाची मोडतोड म्हणजे स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या वीरांचा अपमान आहे जर इतिहासाचे विद्युत प्रकरण होणार असेल तर महाराष्ट्र ते खपवून घेणार नाही महेश मांजरेकर यांचे सुपुत्र सत्या मांजरेकर यांना या चित्रपटात मावळा म्हणून दाखवण्यात आले आहे मांजरे करांनी आपल्या वाडवडिलांचा चित्रपट बनवावा त्याच्यात त्यांला लॉन्च करावे सत्या नावाचा हा अभिनेता मावळा म्हणून अजिबात शोभत नाही.
तसेच वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या टायटलला सुद्धा आमचा आक्षेप आहे मुळात वेढ्यात मराठे वीर दौडले सात असा तो उल्लेख आहे ज्या ज्या वेळी ऐतिहासिक चित्रपटांना सेंसर करायची वेळ येईल त्या वेळेला इतिहास तज्ञांची कमिटी नेमली जावी त्यांच्या परवानगीने ऐतिहासिक चित्रपटांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळावा अशी अपेक्षा प्रदीप कणसे यांनी व्यक्त केली हे चित्रपट जर प्रदर्शित झाले तर महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स चित्रपटांमध्ये मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.