
स्थैर्य, सातारा, दि. 24 डिसेंबर : सातारा जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका वाढत असताना माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे समाधीस्थान असलेल्या गोंदवले बुद्रुक येथील श्री थोरले राम मंदिरात सध्या थंडीचे उबदार लोकरी पासून बनवलेले कपडे अर्थात कुंची ,स्वेटर,कानटोपी, मफलर, श्रीराम श्री लक्ष्मण व सीतामाईंना घातले जातात. त्यामुळे त्यांचे हे अनोखे आणि देखणे रूप जणू काही लहान बालकांसारखेच भासत आहे. (छायाचित्र -अतुल देशपांडे,सातारा)
