कुमठ्यातील वारकर्‍यांकडून धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत


स्थैर्य, सातारा, दि. 9 ऑक्टोबर : कुमठे (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थ आणि गावातील वारकरी मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्य जमा करून ते दोन टेंपोद्वारे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात पोहोच केले.

अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो नागरिक, शेतकर्‍यांची अपरिमित हानी झालेली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकर्‍यांची केवळ उभी पिके वाहून गेली नाहीत, तर शेतीही वाहून जाऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बांधवांसाठी आपणही फूल न फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा निर्णय कुमठे ग्रामस्थ व गावातील वारकरी मंडळींनी एकत्र जमून घेतला. ग्रामस्थ वारकर्‍यांनी गावात फिरून पूरग्रस्त पीडित बांधवांसाठी वेगवेगळी कीट तयार केली. एका किट मध्ये ज्वारी 10 ते 12 किलो, गहू 5 ते 7 किलो, तांदूळ 5 किलो, साखर 1 किलो, तेल 1 किलो, चहा पावडर 250 ग्राम,चटणी अर्धा किलो, 10 ते 15 नवीन साड्या, 1 टॉवेल, 2कपड्याचे साबण, एक अंगाचा साबण, 1टोपी, विध्यार्थया साठी 70 दप्तरं, 450 वह्या, 300 पेन, काही मूग डाळ, लहान मुलांसाठी/मुली साठी नवीन कपडे 40 नग, नवीन पॅन्ट पीस व शर्ट पीस 40 नग, मुलांना व थोरांना काही ड्रेस 50 नग, चादरी 10 नग अशाप्रकारे धान्य, कडधान्य, साखर, वह्या, पेन, तेल, दप्तरं, साड्या, नवीन कपडे अशाप्रकारे जवळपास तब्बल दोन टेंपो जीवनावश्यक साहित्य जमा केले. यामध्ये गावातील प्रत्येक घटकाने स्वयंस्फूर्तनि योगदान दिले.

एकत्र जमा झालेले दोन टेंपो जीवनावश्यक साहित्य परांडा तालुक्यातील वागे गव्हाण, सोनारी, चिंचपुरा, शेळगाव या गावांमध्ये पूरग्रस्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करण्यात आली. या कामी हभप डॉ. सुहास महाराज फडतरे, उपसरपंच हभप अविनाश महाराज जगदाळे, कृष्णराव जगदाळे, हेमंत जगदाळे, बाळासाहेब चव्हाण, हभप पांडुरंग शिंदे, महेश जगदाळे, संतोष जगदाळे, जितेंद्र जगदाळे, लहुराज ऊर्फ आप्पा सावंत, संजय पवार, श्रीधर जगदाळे, गणेश भोसले, बंडू तांबे यांनी अथक परिश्रम घेऊन समक्ष मदत पोहोचवली.
परांडा तालुक्यातील भागवत वारकरी महासंघाचे हभप पांडुरंग सूर्यवंशी, हभप भारत घोगरे गुरुजी, हभप वेताळ महाराज, हभप ढगे महाराज, दिलीप शेरे या स्थानिकांनी मार्गदर्शन केल्यामुळे जीवनावश्यक मदत गरजू पूरपीडित घटकांपर्यंत पोहचू शकली. याबद्दल सर्व स्तरातून कुमठेकर ग्रामस्थांसह वारकरी मंडळींचे कौतुक होत आहे.

कुमठे ग्रामस्थ व गावातील वारकरी चिंचपुरा ता. परांडा जि. धाराशिव याठिकाणी गेलो असता तेथील एका मातेने आर्त टाहो फोडला. तिने परमेश्वराला या निर्माण झालेल्या परिस्थिती विषयी मदतीची याचना केली. त्याचवेळी आम्हाला पाहून मातेच्या चेहर्‍यावर जो आनंद पहिला. तिथंच आम्हाला भगवंताचं दर्शन झाले. आम्ही धन्य झालो.
ह. भ. प. सुहास महाराज फडतरे, कुमठे


Back to top button
Don`t copy text!