दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२३ | फलटण |
माऊलींचा पालखी सोहळा दि. २० जून २०२३ रोजी फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. मान्सून लांबल्यामुळे व उन्हाचा तडाखा असल्यामुळे यंदा वारकर्यांना प्रचंड गर्मीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारकर्यांची उष्णतेच्या त्रासापासून काही प्रमाणात सुटका व्हावी म्हणून फलटण प्रशासन व तालुक्यातील काही दूध डेअरी यांनी वारकर्यांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
यामध्ये गोविंद डेअरी, हेरिटेज डेअरी व कुटे अॅन्ड सन्स डेअरी यांनी त्यांच्याकडील टँकर्सने स्वच्छ व थंड पाणी पालखी मार्ग, विसावे अशा १८ ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.
प्रशासनातर्फे फलटणमधील इतरही दानशूर व्यक्ती, संस्था यांना वारकर्यांच्या सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.