
दैनिक स्थैर्य । दि. २८ जुन २०२५ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वडजल ते तांबेमळा दरम्यान निंबाळकर वस्ती येथे नामदेव किसन मारकड (वय ८०, रा. न्हावी, ता. इंदापूर जि. पुणे) हे विश्रांती घेत होते व तेथेच झोपी गेले. पालखी पुढे निघाल्यावर नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाही, जागीच त्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना अंत्यसंस्कारासाठी गावी नेले.
फलटण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.