दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची चिट्ठी द्वारे आरक्षण सोडत सोमवार , दि. 15 रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात काढण्यात आली . प्रभागनिहाय आरक्षण सोडत फलटणचे प्रांतधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी हेमंत ढोकले , शंकर क्षीरसागर, रोहित निंबाळकर, विजय बनकर आदीच्या उपस्थितीत सोडत पध्दतीने हे आरक्षण जाहीर करण्यात आले.
आज जाहीर झालेल्या आरक्षणा नुसार प्रभाग व प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक १ ( नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ) पाटील वस्ती, आदर्श नगर भिसे वस्ती . गणेश नगर बेलाचा मळा, शिंदे, बुणगे, नेवसे वस्ती, बेलाचा मळा तर प्रभाग क्रं . २ ( नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ) पंजाब कॉलनी, झारेकरी परिसर, अहिल्यादेवी स्मारक उत्तर बाजू, सूर्या हॉस्पिटल पर्यंत तर प्रभाग क्रमांक 3 ( अनुसचित जाती महिला राखीव ) मोरया नगर, एम. एस. ई. बी. कॉलनी, बिरोबा कॉलनी काळवट मळा असा असून प्रभाग क्र. ४ ( सर्वसाधारण खूला) इंदिरानगर पूर्व भाग, बाळासाहेब नगर ते सरहद्द ओढा असा राहील, प्रभाग क्रमांक ५ ( सर्वसाधारण खूला) नगरपंचायत कार्यालय ते डॉ. अडसूळ, समाज मंदिर, मराठी शाळा, स्टेशन चौक, रावळ इमारत ते एसटी स्टँड, जुना फलटण रोड ते रेल्वे पूल, हिरालाल मिस्त्री सुतार असा आहे. प्रभाग क्र. ६ ( सर्वसाधारण महिला ) श्रीराम बाजार ते कापसे ढाबा , तर प्रभाग क्रमांक ७ ( अनुसुचित जातीसाठी राखीव) चोपन वस्ती, बुनगे मळा, सावित्री हॉस्पिटल, जुनी पोलीस लाईन , प्रभाग क्रमांक ८ (अनुसुचित जमातीसाठी महिला राखीव) बिरोबा वस्ती, खंडाळा नाका, शेळके वस्ती, दगड वस्ती तर प्रभाग क्रमांक ९ (सर्वसाधारण खूला)
भाऊ कुदळे ते विठ्ठल मंदिर ते तानाजी चौक ते गांधी चौक, परदेशी नारळ वाले ते बाजारतळ ते भवानी माता मंदिर ते बाळू क्षिरसागर घर असा असून प्रभाग क्रमांक १० ( सर्वसाधारण माहिलासाठी राखीव) जंगम घर ते संतोष राऊत ते बबलू घोलप, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, गणेश मंदिर, साई मंदिर, गौरी मॉल, राजू नाळे, अशोक शहा घर असा असेल तर प्रभाग क्रमांक ११ ( नागरीकांचा मागास प्रवर्ग )
पोलीस लाईन, भंडलकर वस्ती, बँक कॉलनी, मार्केट यार्ड, रेल्वे पोर्टर चाळ, कमाने घर ते प्रवीण रावळ घर तर प्रभाग क्रमांक १२ ( सर्वसाधारण माहिला बारटक्के घर कोपरा, महावीर दोशी, शिवाजी चौक वैजनाथ गाडे, भंडारी बोळ पूर्व भाग असा असेल, प्रभाग क्रमांक १३ ( सर्वसाधारण माहिलासाठी राखीव) स्वामी समर्थ मंदिर, बाजारतळ, पंच महाजन वाडा, हेमंत दोशी, घाडगे कॉलनी, जाडकर, दत्तात्रेय वाईकर घर, भोरी ते रवींद्र सोनवले घर असा आहे तर प्रभाग क्रमांक १४ ( सर्वसाधारण माहिलासाठी राखीव) कुमार गॅस एजन्सी , सिनेमा थिएटर, लक्ष्मण बुवा शेळके घर रामकृष्ण आमटे घर दुर्गा माता मंदिर ते लाखे घर असा असून प्रभाग क्रमांक १५ ( सर्वसाधारण ) शास्त्री चौक पूर्वभाग डोंबार वाडा वडार वाडा ते शंकराव धायगुडे घर सलीम इनामदार ते भांड गोळे ते चौरे तापडिया घर आहे, प्रभाग क्रमांक १६ ( नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग ) सईबाई सोसायटी, महेंद्र दोषी ते घर असा इमारत, गोटे माळ पाणी टाकी , आणि प्रभाग क्रमांक १७ ( सर्वसाधारण खुला ) खोत मळा, जांभळीचा मळा, माऊली नगर, सावित्री नगर, सुंदर नगर, ठोंबरे मळा, कुरण वस्ती अशी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले लोणंद नगरपंचायत चे ऑफिस सुपिडेंट शंकरराव शेळके पाटील रोहित निंबाळकर व नगर पंचायत कर्मचारी तसेच लोणंद येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.