वांगीवाला गायकवाड ते ड्रॅगनफ्रूटचे बागायतदार – एक यशस्वी प्रवास.


 


स्थैर्य, फलटण दि.२७: फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील श्री.बाबुराव गायकवाड या शेतकऱ्याने ड्रॅगन फळाची लागवड केली आहे. पारंपारिक पीक पद्धती ऐवजी मिश्र पीकपद्धतीचा वापर करत सोबत ठिबक सिंचनाची जोड, बाजारभाव या सर्वांचा विचार करत ड्रॅगन फळ लागवडीचा प्रयोग केला आहे. याचा आढावा कृषी महाविद्यालय पुणेची विद्यार्थीनी कु प्रणाली रामदास शेळके हिने ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ बनसोड सर, डॉ. शिंदे मॅडम आणि डॉ सोनावणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. 

बाबुराव गायकवाड (वय ६८) यांनी वडिलोपार्जित शेती करत पदवीधर शिक्षण पूर्ण केले. एकत्र कुटुंबाची तसेच थोरले बंधू असल्याने १९७८ नंतर वडिलांच्या २० एकर जमिनीवर पालेभाज्या, वांगी, तरकारी पिके घेतली. एक टॅम्पो विकत घेऊन पुणे शहरात स्वतः भाजीपाला विक़ला. त्यावेळी “वांगीवाला गायकवाड” म्हणून प्रसिद्ध असलेल्या यांनी पुढे प्रगती करत आणि नफा मिळवत आणखी जमीन विकत घेतली. मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवले. 

गायकवाड यांनी २०१५मधे ड्रॅगन फळाची माहिती मिळवली. बाजारात असलेली मागणी, कॅन्सर सारख्या आजारावर रोगप्रतिकारक, इतर फळबागांपेक्षा कमी भांडवल, कमी मजूर, कमी पाणी, लवकर फळधारणा या सर्वांचा विचार करत एक नवीन प्रयोग म्हणून त्यांनी २०१५ मध्ये २०५० रोपे आणली.१ एकर जमिनीवर १४ बाय ७ फूट अंतरावर पोल उभारले. आणि उत्तम बाग बहरवली. लागवडीचा नंतर १८ महिन्यानंतर बहार येतो आणि नंतर ४५ व्या दिवसात फळे तयार होतात. सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर केला. साधारण ८ ते १०टन उत्पन्न घेत एकूण खर्च वजा करता ५ ते ७ लाख वार्षिक नफा होतो. गायकवाड आंतर पीक घेतात. प्रगतशील शेतकर्‍यांमधे त्यांची गणना केली जाते. दरवर्षी १००टन ऊस, ५०० नारळ, गुलछडीमधे सीताफळ-५ एकर आणि भाजीपाला घेतात. कोणताही पूर्व अनुभव नसताना त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करत यशस्वीपणे ड्रॅगन फळबाग बहरवली.              


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!