एक हजाराची लाच स्वीकारताना वाईचे उपकोषागार अधिकाऱ्यास पकडले


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । वाई । तक्रारदाराचे पगार बिल व सातवे वेतन आयोगाचा वीस वर्षाचा लाभ मंजूर करण्यासाठी दहा हजाराची मागणी करून तडजोडी अंती दोन हजार मागणी करून एक हजाराची लाच स्वीकारताना वाईचे उपकोषागार अधिकारी सुधाकर शंकर कुमावत लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराचा तीन महिन्याचा पगार व वीस वर्षाचा लाभ सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक एकूण बिल मंजूर करण्यासाठी मोबदला व पुढील बिल काढल्याचे कामाकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी करुन एक रुपये स्वतः स्वीकारताना वाईचे उपकोषागार अधिकारी सुधाकर शंकर कुमावत (हडपसर, पुणे सध्या रा. वाई ) यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सातारा येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस अंमलदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले या सापळा पथकाने केली.या कारवाईने वाई परिसरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!