दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । वाई । वाई वन विभाग व तालुक्यातील सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यात वणवा मुक्त डोंगर योजना घोषित केली आहे. सर्वोदय सेवा ट्रस्ट, युवा वारकरी संघटना व वनविभागाच्यावतीने वाईच्या पश्चिम भागात वणवा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक मांढरे ,सर्वोदय ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे, उपाध्यक्ष प्रकाश वाडकर, सचिव संतोष वाडकर खजिनदार ज्ञानदेव वाशिवले, रोटरी क्लब चे अध्यक्ष दीपक बागडे, काळेश्वरी ट्रस्टचे ज्ञानदेव सणस, पर्यावरण प्रेमी प्रशांत डोंगरे, पी एस भिलारे, रामदास राऊत, संजय चौधरी, वनपाल संग्राम मोरे, सुरेश सूर्यवंशी, वानरक्षक कुमार खराडे, करुणा जाधव यांच्या अनेक युवक सहभागी झाले होते.
जागतिक पातळीवर पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला असून पर्यावरणाचे संतुलन ढासळल्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, गारपीट, हिमवर्षाव, जागतिक तापमान वाढ यासह अशा प्रकारचे नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले असून निसर्गाचे संतुलित चक्र तूटल्यामुळे दुष्परिणाम होत आहेत.
यासाठी वाई तालुक्यात व पश्चिम भागात वनवा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाईच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लागून निसर्गाचे नुकसान होत असते. रॅली मेणवली ते वासोळे या २५ गावात रबविण्यात आली. रॅलीमध्ये प्रत्येक गावात भित्तीपत्रके लावण्यात आली. डोंगरा कडच्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी वनवा विरोधी माहितीपत्रके वाटण्यात आली.
वाई व सामाजिक संस्था वाई यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून आपला गाव व डोंगर वणवा मुक्त राखावे सदर योजनेमध्ये अंतर्गत जुलै महिन्यात सर्व गावची छाननी समिती मार्फत मूल्यांकन करून विजयी गावास रोख रक्कम शिल्ड, गावातील प्रत्येक घरासाठी एक फळझाड, गावातील शाळेतील ग्रंथालयात पुस्तके व ग्रामपंचयतीला खेळाचे साहित्य बक्षीस देण्यात येणार आहे असे वाईच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर यांनी सांगितले.
निसर्गाचा प्रश्न गंभीर आहे. वणव्यामध्ये वन्य प्राणी, पक्षी, कीटक विविध प्रकारच्या वृक्षाच्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे. वन्यप्राण्यांची शिकार करणा-यांवर तसेंच डोंगरांना वणवा लावणाऱ्या विरोधात वनविभागामार्फत कठोर कारवाई करून वणवा लावणाऱ्यास कठोर कारवाई केली पाहिजे सर्वोदय सेवा ट्रस्ट अध्यक्ष संजय जेधे यांनी सांगितले.