वाघोजीराव पोळ यांचे निधन


स्थैर्य, बिजवडी, दि. 16  : दहिवडी, ता. माण येथील ज्येष्ठ नेते श्री सिद्धनाथ उद्योग समूहाचे शिल्पकार वाघोजीराव पोळ यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

माण तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. दुपारी 1 वाजता दहिवडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माण- खटावचे आ. जयकुमार गोरे, माजी आ. प्रभाकर घार्गे, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे ,माजी सभापती रमेश पाटोळे, माजी सभापती अतुल जाधव, खटावचे पंचायत समिती सदस्य विवेक देशमुख, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, अर्जुन काळे, काँग्रेसचे एम. के. भोसले, प्रा. विश्‍वंभर बाबर, दहिवडीचे नगराध्यक्ष सतीश जाधव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील,  नगरसेवक,  सोसायटीचे संचालक, विविध पतसंस्थांचे चेअरमन, सिद्धनाथ उद्योग समूहातील अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा,  सून, नातवंडे असा परिवार आहे. सावडणे विधी गुरुवार, दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजता दहिवडी येथे होणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!