दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराज यांचा ४९ वा समाधी सोहळा (मुख्य दिवस) उद्या, शुक्रवार दि. ०६ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.
त्यानिमित्त सकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत काकडा अभिषेक आरती, सकाळी नऊ वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता, साडेनऊ ते सव्वाबारा वाजेपर्यंत स्वरप्रभात सौ. अपर्णा केळकर, पुणे यांचे भक्तीगीत गायन, दुपारी सव्वाबारा वाजता ‘श्रीं’ची मध्यान्ह आरती, आरती झाल्यावर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद, दुपारी ४ ते ६ ह.भ.प. कमलाकर महाराज, भादोले निमसोड यांचे फुलांचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता फुलांचा कार्यक्रम व नगर प्रदक्षिणा, प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ‘श्रीं’ची आरती व रात्री ‘श्रीं’चा हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.