महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूकीसाठी उद्या मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 2 एप्रिल 2025। सातारा । महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर झालेली असून ही निवडणूक ही प्रत्येक जिल्हयाच्या मुख्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी गुप्त मतदान पध्दतीने सकाळी 8 ते सायंकाळी 5 घेण्यात येणार आहे. निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सातारा जिल्हयातील मतदान केंद्राचे ठिकाण जिल्हा रुग्णालय सातारा फिल्ड हॉस्पिटल खोली क्रमांक 1 व खोली क्रमांक 2 मध्ये पार पडणार आहे. एकूण 2 मतदान केंद्र आहेत. सातारा जिल्हयात एकूण 1 हजार 884 मतदार असून मतदान केंद्र क्र 1 येथे अनु क्र 1 ते 951 एकूण 951 मतदार व मतदान केंद्र क्र 2 येथे अनु क्र. 952 ते 1 हजार 884 एकूण 933 मतदार जोडण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 करिता दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र वैदयकीय परिषदेकडे नोंदणी झालेले व सदर नोंदणी नुतणीकरण केलेले वैदयकीय व्यावसायीक हे मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार यादी प्रसिध्द केली आहे.

प्रत्येक मतदाराला 9 मते देण्याचा अधिकार आहे. एकूण 41 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मतदारांना ओळख पटविण्यासाठीचे दस्तऐवज मतदार यादीत ज्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असे सर्व वैदयक व्यावसायी व्यक्तीशः मतदान करतील आणि मतदारांची ओळख पटविणे सुकर होण्यासाठी पुढील ओळखपत्रे ग्राहय धरण्यात येतील यामध्ये महाराष्ट्र वैदयकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाचे विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या मतदारांसाठी जो ओळखपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे, अशी छायाचित्रासहित ओळखपत्रे. तसेच नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास संबधीत मतदाराची ओळख पटविण्यासाठी ज्यावर छायाचित्र आहे असे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे.

मतदान केंद्रावरील निवडणूक कामकाज होण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसिलदार दर्जाचे अधिकारी व इतर महसूल कर्मचारी असे एकूण 15 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहे. क्षेत्रीय अधिकारी म्हणून डॉ. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, समन्वय अधिकारी डॉ. भारती दासवाणी व सातारा जिल्हयाचे निवडणूकीचे संपूर्ण कामकाज उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक महाराष्ट्र राज्य दंत परिषद मुंबईच्या श्रीमती शिल्पा किरण परब हे पाहात आहेत.


Back to top button
Don`t copy text!