दैनिक स्थैर्य | दि. ५ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ०४/११/२०२४ रोजी निवडणूक निरीक्षक ूुह पी. बावा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुधोजी हायस्कूल प्रांगणात मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणूक निरीक्षक नूह पी. बावा यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावावा तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले. .
यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण श्री. सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांनी प्रास्तविक केले व २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करणेबाबतची प्रतिज्ञा सर्वांना दिली.
याप्रसंगी फलटण शहरातील बी. एल. ओ. पर्यवेक्षक व बी. एल. ओ. तसेच स्वीप टिम आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.