मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम २०२३

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । सातारा । भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त  पुनरीक्षण कार्यक्रम दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केला आहे.

या उपक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी बुधवार दि. ९  नोव्हेंबर २०२२ रोजी. दावे आणि हरकती स्वीकरण्याचा कालावधी दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२, मतदार नोंदणीसाठीची चार विशेष शिबिरे शनिवार दि. १९ नोव्हेंबर आणि रविवार दि. २० नोव्हेंबर तसेच शनिवार दि. ३ डिसेंबर  आणि रविवार दि. ४ डिसेंबर २०२२.  ग्रामसभा-मतदार यादी वाचन व नोंदणी गुरुवार दि. १० नोव्हेंबर, विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांसाठी विशेष शिबिरे शनिवार दि. १२ व रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे शनिवार दि. २६ व रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२. दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी सोमवार दि. २६ डिसेंबर २०२२  पर्यंत. गुरुवार दि. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दीची असेल.

जर २०२२ च्या जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी १८ वर्षाचे होणार असाल तर दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरु होणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र. ६ भरुन अगाऊ मतदार नोंदणी करु शकता. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी https://nvsp.in, http://voterportal.eci.gov.in  या संकेतस्थळांना भेट द्या किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲप वापरा.  मतदार यादी पाहण्यासाठी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला, वोट हेल्पलाईन या मोबाईल ॲपला किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या.

नाव  नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी पुढीलपैकी कोणताही एक दस्तावेज जोडावा – जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी, आठवी, दहावी, बारावी यौपकी एक इयत्तेची गुणपत्रिका, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, आधार कार्ड.

निवासाच्या पुराव्यासाठी पुढीलपैकी कोणताही एक दस्तावेज जोडावा- बँक/किसान/टपाल यांचे पासबूक, रेशनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, अलीकडील भाडेकरार, घर नोंदणीकृत विक्री करार,भटक्या विमुक्त जमातीसाठी स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, महसूल खात्याकडील जमीन मालकी दर्शविणारी कागदपत्रे, नोंदणीकृत भाडे करार, पाणी बील/लाईट बील/ गॅस कनेक्शन इ.

प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी अर्ज क्र. ६, अनिवासी मतदारांसाठी अर्ज क्र. ६ अ, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे, आक्षेप घेणे, स्वत:चे नााव वगळणे, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज क्र. ७, मतदार यादीतील तपशिलामधील दुरस्तीसाठी अर्ज क्र. ८ वापरण्यात यावा.


Back to top button
Don`t copy text!