दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । वडूज । एलआयसी ऑफ इंडिया वडूज शाखेचे विमाप्रतिनिधी विठ्ठल काटकर यांची अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाल्याची माहिती विमाविकास अधिकारी रणजित माने यांनी दिली आहे.
माने म्हणाले की विमा व्यवसायाची व्याप्ती सगळीकडे वाढत असून इन्शुरन्स च्या बाबतीत लोकांच्या मध्ये जागृती झाली आहे.त्या अनुषंगाने आमचे विमाप्रतिनिधी विठ्ठल काटकर यांनी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत इन्शुरन्स चे महत्व पटवून देत ग्रामीण भागातील अनेक कुटूंबना विमा कवच दिले आहे.काटकर यांनी तळागाळातील लोकांना विमा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
म्हणून त्यांना विमा व्यवसायातील मानाचा व नामांकित एमडीआर् टी हा पुरस्कार मिळाला असून त्यांची अमिरेकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाली आहे.त्यांचा पुरस्कार हा एलआयसी वडूज शाखेसाठी अभिमानाची गोष्ट असून त्यांना सातारा विभागाचे डिव्हिजनल मॅनेजर, एलआयसी वडूज शाखेच्या शाखा अधिकारी,शुभांगी मालवणकर, उपशाखा अधिकारी भरत गोडसे,सर्व विकास अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.