दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । परवाच एक मध्यम वयस्क पेशंट ओपीडी मध्ये दाखवायला आला होता. थोड चालले की दम लागतो, काहीही करायला उत्साह वाटत नाही, डोकं कधी कधी जड जड होत. त्या पेशंट च वय साधारण ४५ होत. रोजचे रूटीन व्यवस्थित चालू होते. जेवण पण नेहमी सारखे जात होते. ते गृहस्थ प्युयर वेज होते. पण वरील तक्रारी मात्र काही दिवसांपासून जाणवायला लागल्या होत्या. बाकी सर्व तपासणी केल्यानंतर त्या बरोबर व्हिटॅमिन B12 तपासून घेतले.
Level आली 100 pg/ml. कमीत कमी 200 pg/ml असायला पाहिजे आणि 300 ते 350 च्या वर म्हणजे उत्तम. सध्या असे बरेच पेशंटस आहेत की ज्यांना वर सांगितल्या नुसार त्रास होतो आहे आणि कारण बाकी काहीच सापडत नाही पण व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 लेव्हल बरीच कमी सापडते आणि हे विशेषतः शाकाहारी आहार खाणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
आता या मुळे बरेच प्रश्न उपस्थित होतात.
- शुद्ध शाकाहारीना नेहमीच व्हिटॅमिन B१२ ची कमतरता होते का ?
- व्हिटॅमिन B१२ कशा कशा मध्ये आढळते ?
- व्हिटॅमिन B१२ च्या deficiency मुळे काय काय आजार होऊ शकतात ?
- हार्ट अटॅक चे आणि व्हिटॅमिन B १२ चा काय संबंध आहे ?
- या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर बघुयात.
सर्व प्रथम व्हिटॅमिन B१२ आपल्या शरीरा मध्ये का आवश्यक आहे ते बघुयात – व्हिटॅमिन B १२ अर्थात कोबालामिन हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे की जे DNA बनवण्यासाठी आणि RBCs बनवण्यासाठी वापरले जाते. Proteins आणि fatty acids चे विघटन करण्यासाठी ह्या vitamin चा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि हे सर्व आपल्या यकृता (Liver) मध्ये केले जाते.
व्हिटॅमिन B12 आपल्या बरोबर , व्हिटॅमिन B6 आणि Folic Acid हे एकत्र येऊन homocystein नावाच्या amino acid चे विघटन करते.
Homocystein जेवढे कमी तेवढे रक्त पातळ राहते आणि सारखे गोठत नाही.
व्हिटॅमिन B12 हे नसांच्या वरचे आवरण ज्याला myelin sheath असे म्हणतात ते तयार करते आणि म्हणून नसेचे काम उत्तम चालण्यास ते आवरण सशक्त असणे फार गरजेचे आहे.
ह्या सगळ्या कारणांमुळे VITAMIN B12 हे आपल्या शरीरा मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे जसे की,
- DNA आणि लाल पेशी बनवण्या साठी.
- रक्त पातळ ठेवण्यासाठी.
- Nerve चे आवरण शाबूत ठेवून त्याचे काम योग्य रीतीने चालण्यासाठी.
- चरबीचे विघटन करून ती विरघळण्यासाठी.
आता हे कळल्यावर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की Vitamin B12 ची कमतरता असल्यावर काय लक्षणे दिसतील.
- RBCs कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे किंवा नीट तयार न-झाल्या मुळे आपण जो प्राण वायू आत घेतो तो योग्य रीतीने सर्व शरीराला पोहोचवला जात नाही आणि साहजिकच अशक्त पणा, लगेच दम लागणे, अपचन, बद्घकोष्टता, असे त्रास जाणवू लागतात.
उत्साह न वाटणे , सारखे गळल्या सारखे वाटणे ही आणखीन पुढची स्टेज होऊ शकते. ओघाओघाने प्रतिकार शक्ती कमी होऊन इन्फेक्शन लगेच पकडले जाते. कोरोना महामारीत ज्यांचे व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 कमी होते त्यांना जास्त त्रास झाला आणि काहींच्या जीवावर पण बेतले. - नसे (Nerve)चे काम नीट न झाल्यामुळे हाता – पायांना सुया टोचल्या सारखा भास होणे. मुंग्या येणे, हात पाय बधीर होणे, हे आवर्जून जाणवते.
- Homocystein चे प्रमाण रक्तात वाढल्यामुळे रक्त पातळ न राहता गोठले तर छोट्या छोट्या रक्त वाहिन्या बंद पडून vital organs चा रक्त पुरवठा खंडित होऊन हृदयाचा झाल्यास हार्ट अटॅक, मेंदूचा झाल्यास paralyasis, आतड्याचा झाल्यास gangrene, असे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात.
- व्हिटॅमिन B१२ आपल्याला कशातून मिळते. प्रामुख्याने नॉनव्हेज foods madhye vitamin B12 उपलब्ध असते. जसे की फिश, मीट , अंडी, Beef, chicken , liver , Pork.
याचे मुख्य कारण की प्राणी जेव्हा माती मध्ये उगवणाऱ्या वनस्पती तशाच (न धुता) खातात त्या वाटे त्यांच्या शरीरा मध्ये व्हिटॅमिन B 12 मुबलक जाते आणि म्हणून मांसाहार केला की त्यांच्या वाटे आपल्याला व्हिटॅमिन B१२ मिळते. पण याचा अर्थ असा नाही की मांसाहार न करणाऱ्यांना व्हिटॅमिन B१२ मिळतच नाही.
कोबाल्ट ज्या मध्ये जास्त असते जसे की दूध, Yogurt, Brocolli, सुका मेवा – बदाम , अक्रोड खारीक खजूर, ओट्स(oats), पालक, सोया मिल्क , Avocado , जमिनीत येणारी कंद मुळे जसे की बटाटा , beetroot , गाजर , रताळी (ती कच्ची खाल्यास जास्त योग्य).
हे सर्व खाल्यानंतर पचनासाठी एक intrinsic factor ज्याला Mucoid protein असे म्हंटले जाते ते absorption साठी अत्यंत आवश्यक असते.
ज्यांना acidity, gas trouble , अपचन , constipation याचा त्रास आहे अशा लोकांना खाल्लेले व्हिटॅमिन B१२ पचत नाही आणि मग योग्य आहार घेऊन सुद्धा त्यांना deficiency होते. नॉनव्हेज खाणाऱ्यांना सुद्धा हे लागू आहे.
डायबिटीस असणाऱ्या लोकांना Metformin ही गोळी घेत असल्यास ती सुद्धा हे mucoid protein destroy करून deficiency वाढवते त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या लोकांनी ही बाब आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे.
वरील कुठलाही त्रास असल्यास किंवा चाळीशी नंतर दर वर्षी सर्व तपासण्यां बरोबर Vitamin B 12 आणि Vitamin D3 हे तपासून घेणे गरजेचे आहे कारण दोघांची कमतरता असल्यास जास्त त्रास होतो.
Vitamin B 12 level खूपच कमी म्हणजे 100 च्याहीखाली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्वरित ट्रीटमेंट घेऊन ती वाढवणे इष्टच.
900pg/ml च्या वर रिपोर्ट जर असेल तर व्हिटॅमिन B12 toxicity होऊ शकते . ते ही वाईटच.
सध्या व्हिटॅमिन B१२ ह्या बद्दल खूप जाहिराती आपण बघत आणि वाचत आहोत पण प्रत्यक्षात त्यावर योग्य दृष्टिक्षेप टाकावा या हेतूने हा लेख आपल्यासाठी सादर आहे .
तर मग प्रियजन हो,
राहा सतर्क आणि करा व्हिटॅमिन B12 चेक,
राहा निरोगी, जगा आनंदी , फिट आणि लागू देयु नका आयुष्याला कसलाच ब्रेक!!
जन हितार्थ जारी.
डॉ. प्रसाद जोशी
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.
फलटण .