दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्यामार्फत घरोघरी जावून मतदारयादीचा सर्व्हे सुरू आहे. त्याअंतर्गत काल विडणी येथे जाऊन मतदारांना भेटी देण्यात आल्या. यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, विडणीचे सरपंच सागर अभंग यांच्यासह मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमातील विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.