दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । सातारा । कराड, फलटण व माण (दहिवडी) तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील प्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे. दि. 12 एप्रिल 2022 रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, कराड श्री. आर. एस. इथापे. सहा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा मोबा. 9422606106, दि. 22 एप्रिल 2022 रोजी तहसील कार्यालय, फलटण श्री. आर. एम. जाधव, कल्याण संघटक मोबा. 7798422366. दि. 29 एप्रिल 2022 रोजी तहसील कार्यालय, माण (दहिवडी) श्री. आर. एम. जाधव, कल्याण संघटक मोबा. 7798422366 हे उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधितांनी आपल्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.