श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थानास उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । वाठार स्टेशन । महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे वाठार स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थानास उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट दिली असून या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण देवस्थानाची माहिती घेतली व परिसराचा फिरून आढावा घेतला यावेळी देवस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे याचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ करे, वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे स.पो.नि संजय बोंबले यांचा सत्कार ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी यावेळी भाषण केले त्यांनी सांगितले की या देवस्थानचा परिसर अगदी प्रशस्त व मनमोहक आहे व या पारायण सोहळ्यातील शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे होत असलेले पालन हे खरच वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी यावेळी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थानास आपण सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.

Back to top button
Don`t copy text!