दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । सातारा । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे दि. 4 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
सोमवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.45 वा. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील समाधी परिसर सातारा येथे आगमन. सकाळी 11 ते 12.30 वा. रयत शिक्षण संस्थेच्या 102 व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1 वा. सातारा नगरपालिका निवडणूक- शिवसैनिक व पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती (स्थळ : दैवज्ञ मंगल कार्यालय,समर्थ मंदिर, सातारा). दुपारी 2.30 वा. पत्रकार परिषद (स्थळ : दैवज्ञ मंगल कार्यालय,समर्थ मंदिर, सातारा). दुपारी 3 वा. सातारा येथून मोटारीने नायगाव, ता. खंडाळा, जि. साताराकडे प्रयाण. दुपारी 4 वा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. नायगाव, ता. खंडाळा,जि. सातारा येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.