शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनास आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने गेल्या दोन वर्षात शासनाने केलेल्या कामगिरीवर आधारित मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारलेल्या चित्रमय प्रदर्शनास  इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती)(प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांची उपस्थित होती.

राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त असून किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवरील मांडणीदेखील अतिशय आकर्षक असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

सर्व विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून अतिशय आकर्षक पद्धतीने मांडली आहे. नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट आकर्षून घेत असल्याचे श्री.  वडेट्टीवार यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!