ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । ठाणे । गीता ग्रंथातील ज्ञान विश्वातील मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगरमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व विराट संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थिती लावून संत-महात्म्यांचे आशिर्वाद घेतले. जगतगुरू स्वामी वासुदेवनंद सरस्वती महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, आयोजक श्वेता शालिनी आदी उपस्थित होते. वैदेही शंकराचार्य, योगी यतींद्रनंद महाराज, वल्लभदास महाराज, स्वामी चितरंजनदास, महामंडलेश्वर नवलकिशोर दास, भागवत कथाकार देवकीनंदन ठाकूर आदी संत मंडळी यावेळी उपस्थित होती. संतांच्या हस्ते उपमुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जेव्हा जेव्हा संस्कार समाप्त होतात तेव्हा संस्कृती समाप्त होते आणि जेव्हा संस्कृती संपते तेव्हा सभ्यता लोप पावते. मात्र, संतांनी संस्कार व संस्कृतीला लोप पावू दिले नाही. म्हणून आमची सभ्यता जिवंत आहे. विश्वात सर्वात पुरातन ही सनातन संस्कृती, हिंदू धर्म आहे. या संतांकडून आमचे मन शुध्द केले जात आहे.

संस्कृति मिटवण्यासाठी मंदिराना पुन्हा जोडण्याचे काम महाराष्ट्राच्या कन्या अहिल्या देवी होळकर यांनी केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद मोदी हे काम करत आहेत, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!