फलटणचे विश्वजीत मिलिंद देशमुख यांची हावर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२३ । फलटण । विश्वजीत मिलिंद देशमुख यांची हावर्ड विद्यापीठ अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी (LL.M) निवड झाली आहे.हार्वर्ड साठी निवड होणारे ते सातारा जिल्ह्यातील पहिलेच विद्यार्थी आहेत. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती प्रतिष्ठान आयोजित स्मृती महोत्सवात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.बुलढाणा अर्बन को – ओप. क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणाचे चेअरमन राधेश्याम चांडक तथा भाईजी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, तर केंद्रीय माहिती आयोग आयुक्त उदय माहुरकर, आ. दिपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख यांचे नातू, मुंबई उच्च न्यायालयातील अडव्होकेट मिलिंद देशमुख आणि अडव्होकेट सौ. मानकुवर देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत.

हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणे खूप कठीण मानले जाते, या विद्यापीठामध्ये आजपर्यंत जे विद्यार्थी शिकले त्यात बऱ्याच देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश, जॉन एफ केनेडी, बिल क्लिटन भारतीय उद्योजक रतन टाटा, कपिल सिब्बल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड इत्यादीचा त्यामध्ये समावेश आहे.

शिक्षणाचा वारसा लाभलेल्या विश्वजीतचे आजी – आजोबा प्राचार्य शिवाजीराव जाधव आणि प्रा. सौ. वसुधा जाधव (रयत शिक्षण संस्था, सातारा), प्राचार्य विश्वासराव देशमुख यांचे मार्गदर्शन त्यास लाभले. मूळ गाव सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव असणाऱ्या   माण देशातूनही विश्वजीतवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई येथून विश्वजित देशमुख यांनी कायद्याची पदवी LL.B सन २०२२ मध्ये संपादन केली. तसेच मुंबई उच्च न्यायालयात संशोधन सहाय्यक आहेत. त्यानी डॉ. उथर चालटन- स्टीव्हन्स याच्यासोबत संशोधन सहाय्यक म्हणून काम केले आहे. अँग्लो इंडियन्सच्या इतिहासावर संशोधन केले आहे. भारताचे १९४७ चे विभाजन आणि  अल्पसंख्यांकांवर होणारे परिणाम यावरील संशोधनासाठी ते टाटा – १९४७ विभाजन संग्रह संशोधन अनुदान २०२१ चे प्राप्तकर्ते  आहेत. विश्वजित हे जुरिस्ट लिगल न्युज  अँड कंमेंटरीचे (पिटसबर्ग यूएसए)  मल्टिमीडिया संचालक आहेत. JURIST मधील या कार्यासाठी त्यांना द जीनी शॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ते बोलोग्ना लॉ रिव्हियू (युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्ना इटली) आणि भारतीय घटनात्मक कायदा पुर्नवलोकन त्रिमासिकाच्या संपादकीय मंडळावर काम करतात.

मुंबई अकादमी ऑफ मुव्हिंग इमेजेस, मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये २०२० यंग क्रिटिक्स लॅब कोहॉटचा तो एक भाग होता आणि त्याला चित्रपट समीक्षक म्हणून  प्रशिक्षित केले आहे. ते जर्नल ऑफ  इंटरसेक्शनल अन्यलिसिसचे  प्रकाशक आहेत, त्याची स्थापना भारतात इंटरसेक्शन्यालिटीवर वर चर्चा वाढवण्यासाठी केली गेली आहे.

विश्वजित देशमुख लिगल  ॲक्सीस ना-नफा संस्था चालवतात,जी उपेक्षित समदुायातील लोकांना कायदेशीर सल्ला देते. विश्वजित देशमुख यांचे लेख टाइम्स ऑफ ईस्त्राईल, द इस्टर्न हेरॉल्ड, जुरिस्ट लीगल न्युज अँड कंमेंटरी,  लाइव्ह लॉ, द बरकली  जर्नल ऑफ इंटरनॅशनल लॉ, बार आणि बेंच आणि लाईव्ह हिस्टरी इंडिया येथे प्रकाशित झाले आहेत.या यशासाठी विश्वजित देशमुख यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!